‘हर घर तिरंगा’अंतर्गत धारावीत आज विद्यार्थ्यांची रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्याचे निर्देश सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी आणि शिक्षण संस्थांना देण्यात आले आहे. त्यानुसार महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने धारावीतील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने रॅलीचे आयोजन केले आहे. शाळा आणि महाविद्यालयातील तब्बल 1500 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. 12 ऑगस्ट रोजी मनोहर जोशी महाविद्यालय, धारावी येथे सकाळी 7.30 वाजता झेंडावंदन करून रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर एल.बी.एस. मार्ग, शीव रेल्वे स्थानक, शीव बस डेपोमार्गे अनंत दळवी मैदान येथे रॅलीचा समारोप होईल.