प्रशासनाच्या आळशीपणाचा विद्यार्थ्यांना त्रास; ईव्हीएम वर्गात, विद्यार्थी बाहेर

36

सामना ऑनलाईन । अमृतसर

लोकसभा निवडणूक पार पाडून दोन महिने लोटले. परंतु पंजाबच्या शाळेत एका वर्गात अजूनही ईव्हीम मशीन्स तशाच ठेवण्यात आल्या आहेत. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत असून त्यांचे वर्ग शाळेच्या आवारात होत आहेत.

पंजाबच्या लुधियानातील एका शाळेत लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानसाठी ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आल्या. मतदान, मतमोजणी पार पडली. पंतप्रधान नरेंदे मोदींचा शपथविधी होऊन मंत्रिमंडळही जाहीर झाले. अगदी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या सरकारचा अर्थसंकल्पही जाहीर केला. परंतु प्रशासनाने या शाळेतील ईव्हीएम मशीन्स तसेच ठेवले आहे. याचा त्रास शालेया विद्यार्थ्यांना होत आहे. वर्गात विद्यार्थ्यांऐवजी हे मशीन्स आहेत. आणि मुले वर्गाच्या बाहेर असून शिक्षक तिथेच वर्ग भरत आहेत. या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितले आहे असे शाळेच्या मुख्यध्यापिका ए नंदा यांनी म्हटले. तसेच या मशीन्स लवकरात लवकर हटवल्या जातील असेही वरिष्ठांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या