बंद काळात परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थांना ६ जानेवारीला पेपर देता येणार

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा-कोरेगाव येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आंदोलनामुळे अनेक विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा त्या दिवशीचा पेपर देणे शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांची ही अडचण ओळखून विद्यापीठ प्रशासनाने ज्यांना बुधवारी परीक्षा देता आली नाही त्यांना ६ जानेवारी रोजी अर्थात शनिवारी पेपर देता येईल, असे सांगितले.

बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या १३ परीक्षा होत्या. या परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना बुधवारी पेपर देणे जमले नाही. आता या विद्यार्थ्यांना शनिवारी परीक्षा देता येईल. विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयामुळे बीए, एमएड, एम.ए, बी.कॉम, एम.कॉम, बीएससी, एम.सीए, एल.एल.बी च्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या