नव्या युगाची सुरुवात…2048 मध्ये जगात होतील महत्त्वाचे बदल..

अनेक भविष्यवेत्त्यांनी आगामी काही वर्षात नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ते नेस्टोदेमस यांनीही 2020 या वर्षात जगात काही महत्त्वाचे बदल होतील. त्या बदलानंतर जग नव्या युगाकडे वाटचाल करेल, असे भाकीत वर्तवले होते. आता काही संशोधकांनी जागतिक लोकसंख्येच्या आधारे केलेल्या अभ्यासातून 2048 मध्ये जग कसे असले याचे अंदाज वर्तवले आहे. आगामी 20 वर्षात जगातील अनेक गोष्टी बदलणार असून नव्या युगाची सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या नव्या युगात आर्थिक वृद्धीसह, जागतिक संतुलन, महासत्ता याबाबतच्या सर्व व्याख्या आणि परिमाणे बदलणार आहेत. या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वच देशांच्या लोकसंख्येत आमुलाग्र बदल होणार आहे. त्यामुळे काही देशांची क्रयशक्ती घटणार असून काही देशांची क्रयशक्ती वाढणार आहे. त्याचा जगावर परिणाम होणार आहे. या बदलत्या क्रयशक्तीमुळे काही देशांची जागतिक स्तरावर आगेकूच सुरू होणार आहे. तसेच वैविध्यपूर्ण संस्कृती आणि ज्ञानामुळे हिंदुस्थान नव्या युगात मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या 2048 मध्ये 1.6 अब्ज असेल. तर 50 वर्षानंतर या लोकसंख्येत 32 टक्क्यांची घच होऊन 2100 मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या 1.09 अब्ज असेल, असा अंदाज आहे. देशातील बदल्या लोकसंख्येमुळे क्रयशक्ती आणि देशातील तरुणांची संख्या यातही बदल होणार आहेत.

हिंदुस्थान, अमेरिका, चीन, जपान यासह 183 देशांचा जागतिक, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील अभ्यास यात करण्यात आला आहे. तसेच लोकसंख्या, जन्म-मृत्यू दर आणि विकासाची गती लक्षात घेत हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन आणि हिंदुस्थानातील क्रयशील लोकसंख्येत (वय 18 ते 60 मधील व्यक्ती) 2048 पर्यंत मोठी घट होणार आहे. त्यामुळे या देशांच्या आर्थिक वृद्धीवरही परिणाम होणार आहे. तसेच जागतिक विकेंद्रीकरणामुळे हिंदुस्थान, नायजेरिया, चीन आणि अमेरिका 2048 पर्यंत जागतिक महासत्ता असतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हिंदुस्थानात 2017 मध्ये क्रयशील लोकसंख्येचे प्रमाण 76.2 टक्के होते. तर 2100 पर्यंत ते 57.8 टक्क्यांपर्यंत घसरणार आहे. तर चीनमध्ये 2017 मध्ये क्रयशील लोकसंख्या 95 टक्के होती. ती 2100 मध्ये 35.7 टक्क्यांपर्यंत घसरणार आहे. त्यामुळे 2048 नंतर नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचा अंदाज या अभ्यासातून संशोधकांनी वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या