महाराष्ट्रातून उद्योग गेल्यानंतर उद्योगमंत्री, वनमंत्र्यांचा गुजरातेत अभ्यास दौरा

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर चिपचा उद्योग गुजरातेत पळवला गेल्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून उद्योगाच्या अभ्यासासाठी अहमदाबाद गाठण्याची वेळ राज्याच्या मंत्र्यांवर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि कनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सीएम डॅशबोर्डच्या अभ्यासासाठी अहमदाबाद दौरा केल्याने जोरदार चर्चा रंगल्या.

गुजरातमध्ये सीएम डॅशबोर्ड ही संकल्पना राबविली जाते. आता या संकल्पनेचा अभ्यास करण्याची गरज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला निर्माण झाली. जे जे उत्तम ते गुजरातमध्येच या साक्षात्कारानुसार मंत्री उदय सामंत आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अहमदाबाद दौरा पार पडला. आता ही संकल्पना महाराष्ट्रात राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आले.

ईडी सरकारमुळे राज्याकर नामुष्की राष्ट्रवादीची टीका

गुजरात विकास मॉडेल अभ्यासासाठी राज्याचे वनमंत्री आणि उद्योगमंत्री गुजरातला जातात एकढी मोठी नामुष्की ईडी सरकारमुळे महाराष्ट्राकर आलीय. महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आणायची याचा अभ्यास करण्यासाठी गुजरातला जावे लागते यासारखे दुर्दैव नाही. महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी अव्वल नंबर राहिला आहे. देशात राज्याचे महत्त्क आहे. असे असताना गुजरातचा अभ्यास करावा लागणे हे दुर्दैव असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.