हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

1381

हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रावसाहेब भापकर असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते शांत,  संयमी व मनमिळावू स्वभावाचे होते. भापकर मूळचे नगर जिल्ह्यातील होते. सध्या वडगाव शेरी परिसरात राहण्यास होते.

रावसाहेब भापकर पोलीस नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. यापूर्वी ते वानवडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गुन्हे म्हणून कार्यरत होते. नियंत्रण कक्षात आज त्यांची सकाळची ड्युटी होती. त्यानंतर ड्युटीवरून घरी गेले असता सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात चांगले काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या