पालकमंत्र्यांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, कोविड रुग्णालयाची केली पाहणी

442

संभाजीनगर येथील कोरोनाबाधितांसाठीच्या रुग्णालयाची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्व अटीचे पालन केले जाते ना, याची देखील पालकमंत्र्यानी चौकशी करत पालन करण्याचे आदेश दिले.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मेल्ट्रान कारखान्याची इमारत कोविड रुग्णालय उभारण्यासाठी ताब्यात घेण्यात आली. या इमारतीत दोन मजल्यावर रुग्णालय सुरु केले जाणार आहे. गेल्या 20 दिवसापासून 250 खाटांच्या रुग्णालयाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रयोगिकरित्या उभारण्यात आलेल्या कोविड वॉर्डची पाहणी केल्यानंतर त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी फरशीची साफसफाई करा, शक्य झाल्यास ती घासून घ्या किंवा त्यावर कारपेट टाकली तर ती स्वच्छ करायला देखील अवघड होणार नाही, अशा सूचना देताच जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनाचे पालन केले जाईल असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या