गणेशोत्सव काळात धोकादायक पुलांवरील वाहतुकीचे नियोजन करा!

260

मुंबईतील 29 पुलांपैकी महापालिकेच्या ताब्यात 25 पूल आहेत. त्यातील काही धोकादायक पूल आहेत. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी, वाहतूक व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात यावे. मुंबईतील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव सर्व दृष्टीने सुकर होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिल्या.

पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुंबईतील पुलांची स्थिती, त्यावर होणारी गर्दी, जड वाहनांची वाहतूक आदीं बाबींचा आढावा घेण्यात आला. यंदा 2797 मंडळांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत 1770 मंडळांना परवाने दिलेले आहेत. 24 तारखेपर्यंत इतर परवाने दिले जाणार आहेत. विविध चौपाटय़ांवर विसर्जनासाठी 69 स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत. 32 ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जाणार आहेत. याशिवाय विसर्जन मिरकणुकीचाही याकेळी आढावा घेण्यात आला. विसर्जनासाठी समुद्रात दूरपर्यंत दिसेल अशी प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. गणेश विसर्जनासाठी अनेक भाविक बोटीद्वारे समुद्रात येतात. किती बोटी आणि त्यात किती माणसे सोडायची याचेही नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान गणेश आगमनाची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर येत्या 28 ऑगस्ट रोजी पालकमंत्री व महापौर विश्वनाथ महाडेश्वर गणेश विसर्जन स्थळांची पाहणी करून आढावा घेणार आहेत.

यावेळी मुंबई उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे सचिव उपनगरप्रमुख विनोद घोसाळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. वीरेश प्रभू, एमएमआरसीचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक रवी कुमार, वाहतूक सहपोलीस आयुक्त दीपाली मसिरकर, करिष्ठ महाव्यवस्थापक दयानंद चिंचोलीकर, मुंबई महापालिकेचे अभियंता दराडे, एमएमआरडीएच्या शिकानी पाटील, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता शा. सु. गांगुर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी श. क. बोरकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन कनगे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या