विंग कमांडर अभिनंदनला पकडणारा सुभेदार अहमद घुसखोरी करताना ठार

289

एअरस्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानचे ‘एफ-16’ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडणारा पाकिस्तानी कमांडो सुभेदार अहमद खान सीमेवर घुसखोरी करताना हिंदुस्थानी लष्कराच्या गोळीचा निशाणा बनला. अहमद खान हा सीमेवर अतिरेक्यांना घुसखोरीसाठी मदत करत असल्याचे सांगण्यात आले.

पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा सुभेदार अहमद खान नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘जैश ए मोहंमद’च्या अतिरेक्यांना घुसखोरीसाठी मदत करत होता. 17 ऑगस्ट रोजी नकियाल सेक्टरमध्ये अतिरेक्यांना घुसखोरी करता यावी म्हणून पाकिस्तानी लष्कराने तुफान गोळीबार केला. हिंदुस्थाननेही या गोळीबाराला कडक प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात अहमद खान ठार झाला.

आपली प्रतिक्रिया द्या