सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी अभिनेता सुबोध भावे

597
फोटो सौजन्य- फेसबुक

चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये हे संचालक मंडळ कार्यरत असणार आहे. संचालक समितीत पाच जणांची निवड करण्यात आली आहेया समितीत संग्राम शिर्के, अभिनेत्री निशा परूळेकर, अशोक देसाई, सायली कुलकर्णी यांचादेखील समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या