सुबोध भावेची नवी इनिंग ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेची केली निर्मिती

नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर अभिनेता सुबोध भावे आता निर्माता म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. त्याची पहिलीवहिली निर्मिती असलेली ’शुभमंगल ऑनलाईन’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच आहे. आतापर्यंत  एका व्हिडिओ कॉलवर साऱया भेटीगाठी पार पडत, मन जुळत, मैत्री होत असे. पण, ऑनलाईन लग्नाच्या गाठी जुळतील ? असंच काहीसं आपल्या शंतनू – शर्वरीचा आयुष्यात घडणार आहे. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं. यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत म्हणजे ही मालिका. सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ही मालिका 28 सप्टेंबरपासून रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या