सुबोध भावेचे पुन्हा ‘एकदम कडक’, अश्रूंची झाले फुले प्रेक्षकांच्या भेटीला

सामना ऑनलाईन । मुंबई

आणि काशीनाथ घाणेकर हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर सुबोध भावे आता लाल्याच्या भुमिकेत पुन्हा दिसणार आहे. घाणेकरांच्या चरित्रपटात लाल्याचा थोडा अंश होता. आता अश्रूंची झाली फुले या नाटकातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे लाल्याची भूमिका साकारणार असून नाटकाचा फर्स्ट लूक सुबोध भावेने शेअर केला आहे.

वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे नाटक चांगलेच गाजले होते. काशीनाथ घाणेकर यांनी केलेला लाल्या तेव्हा प्रेक्षकांनी उचलून धरला होता. आणि काशीनाथ घाणेकर चित्रपट यशस्वी झाल्यानंतर अश्रूंची झाली फुले हे नाटक आपण घेऊन येणार आहोत असे सुबोध भावेने जाहीर केले होते. त्यानुसार या नाटकाची पहिली झलक सुबोध भावेने आपल्या फ़ेसबुकवर शेअर केली आहे.

नाटकाचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले असून नाटकात शैलेश दातार, सीमा देशमुख आणि उमेश जगताप यांच्याही भूमिका आहेत. नाटकाचे फक्त ५१ प्रयोग होणार असे टीझरमध्ये म्हटले आहे. सुबोध भावे लाल्याची भूमिका साकारणार म्हणून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या