‘हॅशटॅग तदेव लग्नम’मध्ये  सुबोध-तेजश्रीची जोडी

हॅशटॅग तदेव लग्नम’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा पार पडला. या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नावावरूनच हा चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करणारा दिसतोय.

शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित, आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांची आहे. मंदार चोळकर आणि क्षितिज पटवर्धन यांनी गीतलेखन केले आहे, तर पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले,  ‘‘लग्नसंस्थेवर आधारित हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल.’’