सुबोध भावे घेऊन येताहेत ‘पुष्पक विमान’

सामना ऑनलाईन । मुंबई

आज अनेक मराठी कलाकार दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. याच कलाकारांमधला एक म्हणजे अभिनेता म्हणजे सुबोध भावे. मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनय साकारलेल्या सुबोध भावेने ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. आता लवकरच अजून एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध करणार आहे.

pushpak-viman

सुबोध भावे दिग्दर्शित दुसऱ्या मराठी चित्रपटाचे नाव आहे ‘पुष्पक विमान’. दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त सुबोध भावेने या चित्रपटाच्या नावाचे पोस्टर सोशल मिडीयावर पोस्ट केलं होतं. सवैभव चिंचाळकर या चित्रपटाचं सहदिग्दर्शन करणार आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा सुबोध भावे दिग्दर्शक म्हणून या चित्रपटात काय कमाल दाखवणार आहे ते पाहण्यासारखं असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या