पुढील दिवाळी राम मंदिरात साजरी करू- सुब्रमण्यम स्वामी

47

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘राम मंदिराचं काम लवकरच सुरू होणार असून येत्या दिवाळीपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येईल’, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. रामराज्य विषयावरील एका व्याख्यानामध्ये स्वामी बोलत होते. ‘अयोध्यामध्ये पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर तयार होण्याची शक्यता आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी आवश्यक सामग्रीही तयार आहे. त्यांना फक्त स्वामी नारायण मंदिराप्रमाणे जोडण्याचीच गरज आहे,’ असेही स्वामी म्हणाले.

‘राम मंदिराच्या उभारणी नव्या कायद्याची गरज नाही. आम्ही कायदा आणू शकतो. मात्र त्याची गरज नाही. कारण आम्ही हा खटला जिंकत आहोत आणि मला तसा विश्वास आहे’, असे स्वामी म्हणाले. ‘अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधीच या विषयावर गहन चर्चा केलेली आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डकडे मनाई करण्यास काही संधीच नाही’, असे स्वामी यांनी सांगितलं.

अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला ६ डिसेंबरला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या