इंधनदर इतकाही वाढवू नका की जनता विद्रोह करेल, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

30

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंधनदराच्या भडक्याविरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे देशव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सरकारने इतक्याही वाढवून ठेवू नयेत की, जनता सरकारविरोधात विद्रोह करेल, असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले की, अर्थशास्त्रानुसार व्यापक स्तरावर इंधनाची किंमत ४० रुपये असायला हवी. या बाबतीत पेट्रोलियम मंत्र्यांना पंतप्रधानंनी सांगायला हवं की, आर्थिक प्रश्नांमध्ये पेट्रोलियम मंत्री किंवा मंत्रालयाप्रमाणे विचार करू नये. कारण, इंधनदर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर जनता विद्रोहाच्या पातळीवर येईल, असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

आपला मुद्दा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून समजवताना स्वामी म्हणाले की, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रानुसार जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा इंधनदर वाढतो. कारण अर्थशास्त्राच्या या प्रकारात केवळ विक्रेता आणि ग्राहक अंतर्भूत असतो. पण हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र नाही, तर स्थूललक्षी अर्थशास्त्र आहे, असं स्वामी यावेळी म्हणाले. तसंच यापूर्वीही स्वामी ४० रुपयांपेक्षा अधिक किमतीने प्रतिलीटर पेट्रोल विकलं जाणं ही जनतेची लूट असल्यांच विधान स्वामी यांनी यापूर्वीही केलं आहे.

summary- Subramanian Swamy slams bjp over petrol rates hike

आपली प्रतिक्रिया द्या