माळवाडीतील शेतकरी कुटुंबातील भाकरे पती-पत्नीची वैद्यकीय शिक्षणात भरारी

53

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भाग असलेल्या छोट्याशा माळवाडी (टाकळी हाजी) येथील शेतकरी कुटूंबांतील मुलगा दत्तात्रय मनोहर भाकरे व त्यांची पत्नी स्वाती दत्ताञय भाकरे यांनी वैद्यकीय क्षेञात एम.बी.बी.एस.नंतर आता एम.एस.आर्थो आणि डी. जी. ओ. (स्ञी रोग तज्ञ) पदवी संपादित करीत वैद्यकीय शिक्षणात भरारी घेतली आहे. दोघांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाने हे दांपत्य परिसरातून कौतुकास पात्र ठरत आहे. तर या यशाबद्दल सर्वच क्षेञातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दत्ताञय भाकरे यांचे वडिल मनोहर भाकरे हे शेतकरी आहेत. शेतकरी असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असताना दत्ताञय भाकरे याच्यात लहानपणापासूनच शिक्षणात असलेले चातुर्य लक्षात घेत त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शिक्षणात सर्वोतोपरी पाठबळ दिले. तो शाळेत हुशार असल्याने त्याचा लहान भाऊ बाळासाहेब भाकरे याने देखील वडिलांना दत्तात्रयच्या शिक्षणासाठी भक्कम साथ दिली. दत्तात्रयचे चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण माळवाडी येथिल जि.प.प्राथमिक शाळेत तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण टाकळी हाजी येथिल बापूसाहेब गावडे विद्यालयात झाले आहे. १० वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविल्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत शास्त्र शाखेत प्रवेश मिळवत जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर १२ वीच्या परिक्षेत नेत्रदीपक यश संपादित करीत चांगले गुण प्राप्त केल्याने त्याला पुणे येथील बी.जे.मेडिकल काँलेजमध्ये शासकीय नियमानुसार एम.बी.बी.एस साठी प्रवेश मिळाला. तर पत्नीने देखिल बी.जे.मेडिकल येथेच एम.बी.बी.एस.आणि स्ञी रोग तज्ञ म्हणून शिक्षण घेतले आहे. दत्ताञय भाकरे व पत्नी स्वाती यांनी एम. बी.बी.एस आणि एम. एस.ऑर्थो मधून शिक्षण पूर्ण केले आहे. भाकरे दांपत्याने ग्रामीण भागातील असताना ही वैद्यकीय शाखेत उच्च पदवी घेत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे शिरुर,पारनेर तालुक्यातून अभिनंदन होत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या