मध्य रेल्वेच्या हॉकीपटूंचा चौकार; टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानी महिला संघात निवड

टोकियो ऑलिम्पिक 2021मध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई डिव्हिजनच्या चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघातील 16 सदस्यांच्या संघात मध्य रेल्वेच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 16 सदस्यांच्या हिंदुस्थानी महिला हॉकी संघातील 13 खेळाडू रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकीट तपासनीस म्हणून काम करणारे चारही खेळाडू हेड टीसी मोनिका मलीक, वंदना कटारिया, सुशिला चानू पुखरामबम आणि स्टँड-इन गोलकिपर रजिनी एतिमारपू यांची हिंदुस्थानी ऑलिम्पिक महिला हॉकी संघात निवड झाली आहे. या खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून खेळत आहेत. तसेच यांच्या प्रशिक्षक हेलन मेरी (अर्जुन पुरस्कार प्राप्त) आणि सरिता ग्रोव्हर यादेखील मध्य रेल्वेत कार्यरत असून राष्ट्रीय हॉकीपटू होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या