पैसा फंडची यशस्वी निकालाची परंपरा यावर्षीही कायम!

21

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या ‘पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालया’चा निकाल यावर्षीही उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने निकालाची आपली उज्वल परंपरा यावर्षीही कायम राखल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष रवींद्र शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक नेहा संसारे यांनी अभिनंदन केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९ : १५ टक्के, प्रथम क्रमांक घेवडे प्रतिक्षा प्रकाश ८१:३८, द्वितीय क्रमांक चव्हाण शेफाली अरविंद ७७:२३, तृतीय क्रमांक चव्हाण शृती शांताराम ७५:३८, वाणिज्य शाखेचा निकाल ९७:६० टक्के लागला असून प्रथम क्रमांक जुवळे प्रतिक्षा गंगाराम ८२:१५, द्वितीय क्रमांक गुरव दिव्या महेश ८०:६१, तृतीय क्रमांक सुवरे विद्या अनंत ७९:३८ कला शाखेचा एकूण निकाल ७६:१९ टक्के लागला असून प्रथम क्रमांक गुरव सारिका सुनिल ६२ :०० द्वितीय गुरव अश्विनी विश्वास ५५:०७, तृतीय गमरे आशिक जीवन ५२:७६ असे गुण मिळाले आहेl. तीनही शाखा मिळून कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६:५९ टक्के लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या