घोडेबाजाराच्या आरोपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी – सुधीर मुनगंटीवार

भाजप काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याच्य तयारीत आहेत असा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. हा आरोप खोटा असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस झाले आहेत. अद्यापही सत्तास्थाप झाली नाही. त्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला गेला होता. भाजप विरोधी पक्षांचे आमदार फोडण्याच्या तयारीत आहे असा आरोपही त्यांनी केला होता. भाजपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आरोप त्यांनी पुढील 48 तासांत सिद्ध करावे असे आव्हान मुनगंटीवार यांनी दिले आहे. तसेच हे आरोप त्यांना सिद्ध करता येत नसतील तर त्यांनी जाहीर माफी मागावी असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या