चित्रपटासाठी नाव सुचवा आणि आयफोन जिंका

51

सामना ऑनलाईन। मुंबई

लाईक करा, ट्विट करा

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा केली. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम करणाऱ्या हिरानींना या चित्रपटाचे शीर्षक देणे कठीण जात आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या चित्रपटाचे नाव सुचविण्यास सांगितले आहे. तसेच ज्याचे नाव निवडले जाईल त्याला बक्षिस म्हणून आयफोन देण्यात येणार आहे.

‘हिरानी यांच्या कार्यालयात एक बॉक्स ठेवण्यात आला असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुचणारी नावे या बॉक्समध्ये टाकण्यास सांगितले आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार रणबीर कपूर व सोनम कपूर हे देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या विजेत्याला हिराणींकडून ९२ हजार रुपयांचा आयफोन देण्यात येणार आहे. असे सूत्रांनी सांगितले.संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात रणबीर कपूर संजूबाबाचा रोल करणार आहे. तर सुनिल दत्त यांची व्यक्तिरेखा अक्षय खन्ना साकारणार आहेत. या चित्रपटात सोनम कपूर व तब्बू या अभिनेत्रीही आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या