बायको दारू प्यायची, फोनवर तरुणांशी बोलायची; भिंतीवर सुसाईड नोट लिहीत नवऱ्याने केली आत्महत्या

1070
प्रातिनिधिक

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एक हादरवून टाकणारे हत्याकांड घडले आहे. इथे महिलेची मुलांसह हत्या करण्यात आली आहे. ही हत्या महिलेच्या नवऱ्याने केली असून त्यांना मारल्यानंतर नवऱ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्थला भागात घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या नवऱ्याला त्याच्या बायकोवर संशय होता आणि संशयापोटी त्याने निष्पाप मुलांचाही खून केला.

धीरज आणि काजल यांना दोन मुलं होती. धीरजने आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवर त्याने टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण लिहून ठेवलं आहे. त्याने लिहिलं आहे की काजल ही दारू प्यायची. ती तरुणांशी मोबाईलवर बोलायची असंही धीरजने म्हटलंय. ज्या तरुणांशी काजल बोलायची असा धीरजला संशय होता त्या तरुणांचे मोबाईल नंबरही धीरजने भिंतीवर लिहून ठेवले आहेत. आपण काजलवर मनापासून प्रेम करायचो असं शेवटचं वाक्य लिहीत धीरजने आत्महत्या केली.

धीरजने आत्महत्या करण्यापूर्वी काजल आणि दोन्ही मुलांचा गळा दाबून खून केला. धीरजने त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या मृत्यूला अंकीत टीकेंद्र आणि बबली जबाबदार असल्याचेही म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या