साथ अशीच राहू दे!

सहजीवनी… या सदरात यंदा त्यांच्या संसााराविषयी वल जोडीदाराविषयी सांगताहेत सुलताना तांबोळी…

-आपला जोडीदार – अकिल तांबोळी
-लग्नाचा वाढदिवस – ९ मे १९९६
– त्यांचे दोन शब्दांत कौतुक – संयमी, सहनशील व्यक्ती.
– त्यांचा आवडता पदार्थ – मासे आणि आमटी.
– स्वभावाचे वैशिष्टय़ – रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणा.
– खादा त्यांच्याच हातचा पदार्थ – फ्राय केलेले मासे.
– वैतागतात तेव्हा – शांत राहते.
– त्यांच्यातली कला – वाचन, लिखाणाची त्यांना आवड.
– आठवणीतला क्षण – अनेक नवसांनी झालेला मुलगा मोईन.
– त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ – दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे. (माझं घर माझा संसार)
– भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल – ज्या दिवशी लग्न झाले तो दिवस.
– तुमच्यातील सारखेपणा – एकमेकांचा आदर करणे.
– तुम्हाला जोडणारा भावबंध – माझी नणंद शकीला आपा.
– विश्वास म्हणजे – विश्वासाला तडा जाऊ न देणे.
– आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट – खूप आहे, पण त्यांना एवढेच सांगेन तुम्ही खूप साथ दिलीत, पुढेही तुमची साथ अशीच राहू दे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी मी, शकिला आणि आपली मुले सक्षम आहोत. तुम्ही फक्त लवकर बरे व्हा.

आपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं नवं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा आपल्या जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता –  आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ किंवा backspage18@gmail.com या ईमेलवरही पाठवता
येईल.