विद्यादानाचा ध्यास !

3032

सुलताना अकील तांबोळी, नाशिक

माझ्या सासू व सासऱयांचे अकाली निधन झालं. घरचा आधारवड अचानक निघून गेल्याने आमच्या कुटुंबावर आभाळ फाटलं होतं. एकवेळ जेवण बनवून तेच दोन वेळा खाऊनही शिल्लक राहत होते. मानसिक तणावामुळे माझ्या पतींची प्रकृती खालावत चालली होती. काय करावे हे सुचत नव्हते, परंतु म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर! मी आणि माझी नणंद शकिलाआपा आम्ही दोघीही बी.एड. पदविकाधारक असल्याने आम्ही घरात चर्चा करून शिकवणी चालू करण्याचा निर्णय घेतला. आमचा विभाग हा हातावर पोट भरणारा असल्यामुळे फीची सक्ती केली नाही. परंतु फीच्या अभावी विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणात खंड पडू नये तसेच त्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर चांगले संस्कारसुद्धा मिळाले पाहिजेत अशी सूचना माझ्या पतीने केली व आम्ही ती मान्य केली.

त्यानंतर आम्ही घरी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. सहा वर्षांपूर्वी लावलेल्या या इवल्याशा रोपटय़ाचे अल्पावधीतच वटवृक्षात रूपांतर झाले. यात आम्हाला आमच्या जमधाडे चौकातील नागरिकांचे खूप सहकार्य लाभले. आम्ही सर्व दुःख विसरून नवीन आयुष्याला सुरुवात केली. घराला घरपण लाभलं.

आज आमचे विद्यार्थीच आमचं विश्व आहे व त्यांच्यातच आम्ही रमतो. त्या निरागस बाळांचे हसणं, खेळणं, बागडणं मनाला एक समाधान देऊन जातातं. सुट्टीच्या काळात ही माझी बाळं नसतात तेव्हा मी अतिशय बेचैन व कासावीस होते. शाळा कधी सुरू होतील व माझी मुले मला कधी भेटतील याची मी क्षणोक्षणी वाट पाहत असते. माझी परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की, माझे विद्यार्थी हे या देशाचे जबाबदार नागरिक व्हावेत व त्यांच्याकडून समाजाची अखंड सेवा व्हावी.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळंया साऱयांच्या पलीकडेफक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला श्रीमतीही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मगलेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता ः श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामनामार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या