सुमन चंद्रा बुधवारी स्वीकारणार जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार

1347

बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदलीवर आलेल्या श्रीमती सुमन चंद्रा बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत. राज्य सरकारने अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहे. त्यानुसार नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुमन चंद्रा यांची बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रा यांच्या रुपाने जिल्ह्याला नवे जिल्हाधिकारी लाभणार आहेत. विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे लंडनला 20 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार असून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. सध्या जिल्हाधिकारी पदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांचेकडे सोपविण्यात आला आहे. श्रीमती सुमन चंद्रा ऑगस्ट 2017 पासून दिल्ली येथे कार्यरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या