कोण आहे सुमन राव, जी करतेय मिस वर्ल्ड स्पर्धेत हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व

985

जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी मिस वर्ल्ड स्पर्धा शनिवारी इंग्लंडमधील लंडन शहरात पार पडणार आहे. या स्पर्धेत मिस इंडिया 2019 ठरलेली सुमन राव ही हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करणार आहे. 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकून हिंदुस्थानच्या मानुषी छिल्लरने तब्बल 17 वर्षांनी मिस वर्ल्डचा ताज हिंदुस्थानात आणला होता. त्यामुळे मिस वर्ल्डचा किताब पुन्हा हिंदुस्थानात यावा म्हणून देशभरातून सुमनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

suman-rao-1

20 वर्षीय सुमन राव ही मूळची राजस्थानच्या आमेट जिल्ह्यातील आईडाणा गावातील आहे. सुमनचे संपूर्ण शिक्षण नवी मुंबईतील महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे.

suman-rao-7

सुमनचा जन्म जरी गावी झाला असला तरी तिच्या जन्मानंतर तिचे कुटुंब नवी मुंबईला स्थायिक झाले. तिच्या वडिलांचे मुंबईत सोन्याच्या दागिण्यांचे दुकान आहे.

suman-rao-2

सुमन सध्या चार्टड अकाऊंटटचे शिक्षण घेत आहे. तिने कथ्थक नृत्यात प्राविण्य मिळविलेले आहे.

suman-rao-5
2017 मध्ये सुमनने मिस नवी मुंबई ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर दीड वर्षातच तिने मिस इंडिया हा किताब जिंकला.

suman-rao-3
मिस इंडिया ब्युटी पॅजेंट अंतर्गत तिने महिला सशक्तीकरणासाठी व स्त्री पुरुष समानतेसाठी प्रोजेक्ट प्रगती सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या