80 तालिबानी ठार, कमांडर सरहदीचाही खात्मा

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती सरकार आणि तालिबान यांच्यातील समझोत्याचा रॉडमॅप बनवत असतानाच रविवारी भीषण जिहादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी मोठा हवाई हल्ला चढवण्यात आला. कंदहारच्या अर्घनदाब जिह्यात अमेरिकन आणि अफगाणी फौजांनी जोरदार हवाई हल्ला चढवत 80 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्यांत तालिबानी फौजांचा मुख्य कमांडर सरहदी याचाही समावेश असल्याची माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता फवाद अमान यांनी दिली आहे. अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यातील शांतता प्रक्रिया सुरू होत असतानाच कंदहारमध्ये एक तालिबानी गट सरकारी फौजांवर हल्ल्याच्या तयारीत असल्याचे कळताच अफगाणी फौजांनी मित्रराष्ट्रांच्या फौजांच्या मदतीने या तालिबानी गटाच्या छावण्यांवर जोरदार हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे 2 रणगाडे आणि कित्येक वाहनेही नष्ट झाल्याचे वृत्त चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या