स्मार्ट आजी-आजोबांसाठी स्टायलीश सन ग्लासेस्

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसण्यात गॉगल्स, चष्म्याचा वाटाही मोठा असतो. पूर्वी आज केवळ गरज म्हणून या वस्तू न वापरता चारचौघांत उठून दिसण्यासाठीही गॉगल्स वापरले जातात. स्मार्ट आजी-आजोबांना उन्हाळय़ात तर यांची विशेष गरज भासते. त्यांच्या डोळय़ांचे रक्षण तर हाईलच शिवाय त्यांचा लूकही स्टायलीश दिसेल.

वाढत्या वयात डोळय़ांच्या तक्रारी उद्भवतात. यामुळे उन्हात बाहेर फिरायला जाण्यासाठी बाजारातील नवीन फॅशनचे सनग्लासेस उपयोगी पडू शकतात. आजचे आजी-आजोबाही याबाबतीत सतर्क झाले आहेत. स्टायलीश सनग्लासेस घेताना डोळय़ांभोवती असलेली काळी वर्तुळे झाकण्यासाठी, तेथील त्वचा सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चष्मा लावतात. हे चष्मे थोडे मोठय़ा आकाराचे असल्याने पूर्ण डोळ्यांबरोबरच भुवयादेखील झाकल्या जातात. क्लासिक सोफिया लॉरेन, टर्मिनेटर या ब्रॅण्डचे सनग्लासेस वापराव्यात.

दर्जेदार सनग्लासेस
– रेव्हलॉन ग्रीन ग्रॅडिएन्ट, रेव्हलॉन ब्राऊन ग्रॅडिएन्ट, जेआरएस फर्स्ट व्हायोलेट ग्रॅडिएन्ट स्क्वेअर, ब्ल्यू मिरर पायलट, जेआरएस ब्लॅक टायन्टेड राऊंड ग्लास, ब्ल्यू ग्रॅडिएन्ट बटरफ्लाय, कॅट आय, टॉरटॉइज ब्राऊन ग्रॅडिएन्ट, असे अनेक प्रकार आजींसाठी उपलब्ध आहेत.

– आजोबांसाठी रे बॅन लार्ज गोल्डन ग्रीन, रे बॅन आउटडोअरर्स मॅन, रे बॅन युवी प्रोटेक्टर, सिल्व्हर ब्लॅक ब्ल्यू ग्रॅडिएन्ट फुल रिम, मेटल ब्लॅक ग्रेs फुल रिम, शिओमाय सिल्व्हर ब्ल्यू ऑव्हिएटर, एक्सफोरिया मेन्स ग्रीन मर्क्युरी, ब्ल्यू मेटल फ्रेम, रे बॅन ओव्हल सनग्लासेस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

काळजी घ्या…
– ब्रँडेड सनग्लासेस वापरल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका बहुतांशी टाळता येऊ शकतो. ते टाळता येणं शक्य नसलं तरी वाढ कमी करता येते.
– जास्त प्रकाश असल्यास काही ज्येष्ठांचे डोके दुखू लागते. पण स्टायलीश आणि ब्रँडेड चष्मे वापरले तर ही डोकेदुखी टाळता येऊ शकते. दृष्टीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या मोठ्या फ्रेम न घेता योग्य फ्रेम निवडा.
– स्टायलीश चष्मे महाग असा गैरसमज आहे. फॅशनेबल आणि संरक्षण देणारे चष्मेही कमी किमतीत मिळतात.

फॅशन म्हणून वापरताना…
– तो यूव्हीए किंवा यूव्हीबी प्रोटेक्शन देणारा आहे का, याची खात्री करा.
– सनग्लासेसची घेताना त्याची फ्रेम हायपोअलर्गेनिक आहे का याची खात्री करा.
– उन्हाळय़ासाठी शक्यतो चमकदार आणि उजळ रंगाच्या फ्रेम असणाऱया सन ग्लासची निवड करा.
– किरमिजी, गुलाबी, पिवळा, नारिंगी रंगांच्या सनग्लासेसची निवड करू शकतात.
– सध्या स्त्रियांमध्ये मोठय़ा फ्रेम्सची फॅशन आहे. फॅशन ट्रेंडनुसार सनग्लासेसचे आकार वारंवार बदलतात. आपल्या चेहऱयाला शोभेल अशा फ्रेमची निवड करावी.
– करडा, काळा, चॉकलेटी रंग वापरणे पुरुष पसंत करत असले तरी हल्ली लाल आणि गडद निळ्या रंगाच्या फ्रेम्स पुरुषांमध्ये लोकप्रिय होत आहेत.
– स्पार्कल्स, मणी आणि वैशिष्टय़पूर्णरीत्या सजवलेले, मांजरीच्या डोळ्यांच्या आकाराचे, वेगळ्या डिझाईनचे इत्यादी ब्रँडेड सनग्लासेस आजी वापरू शकतात. ते सहल किंवा कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार वापरता येतात.