आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत आठव्यांदा आशिया चषकाकवर नाव कोरले. टिम इंडियाने श्रीलंकेला 15.2 षटकांत अवघ्या 50 धावांत गुंडाळले. त्यानंतर एकही गडी न गमावता 6.1 षटकांत लक्ष्य गाठले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टिम इंडियाच्या या एकतर्फी विजयानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचे मीम्स शेअर होऊ लागले. यावर सुनील गावसकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील गावसकर यांनी मीम्स शेअर करणाऱ्यांना खडसावले आहे. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडावा म्हणून हिंदुस्थानला जाणूनबुजून श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 मध्ये हरायचे होते, असे मानणाऱ्या लोकांवर गावसकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. श्रीलंकेविरुद्ध 213 धावांवर बाद झाल्यानंतर टिं इंडिया मुद्दाम हरली, अशी ओरड करणाऱ्या सीमेपलीकडील सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक आहे. पाकिस्तान अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावा म्हणून भारत मुद्दाम हरत आहे, असे म्हणणारे लोक किती अज्ञानी आणि मूर्ख आहेत, असे गावसकर म्हणाले.
या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होता, जो पावसामुळे वाया गेला होता. पुन्हा सुपर-4 मध्ये भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. जर भारताने हा सामना गमावला असता, तर पाकिस्तानचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडू शकला असता. सुनील गावसकर म्हणाले, या लोकांनी या शक्यतेचा विचारही केला नाही की, जर भारत श्रीलंकेकडून सामना हरला असता आणि त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेला हरवले असते, त्यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे वाया गेला असता, तर भारत अंतिम फेरीत पोहोचू शकला नसता. अशा परिस्थितीत भारत जाणूनबुजून श्रीलंकेकडून का हरेल, असा सवालही त्यांनी केला.
सीमेपलीकडील लोकांना ही मोठी चपराक; हिंदुस्थान-श्रीलंका सामन्यानंतर सुनील गावसकरांचा टोला
sunil-gavaskar-said-this-is-a-big-slap-in-face-to-all-people-who-are-clamoring-for-an-ind-vs-sri lanka-match