सांगली मनपा आयुक्तपदी सुनील पवार

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्तपदी सुनील पवार यांची नियुक्ती करण्यात आली. सुनील पवार यांच्या नियुक्तीचा आदेश आज सांगली महापालिकेला प्राप्त झाला.

सुनील पवार हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार नूतन आयुक्त सुनील पवार हे उद्या (दि. 12) सकाळी कार्यभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली. सुनील पवार यांनी यापूर्वी 2015 ते 2018 या कालावधीत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती.