सनी लिओनीने अमेरिकेत साजरा केला लेकीचा वाढदिवस

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची सगळ्यात हॉट अभिनेत्री सनी लिओनी सध्या अमेरिकेमध्ये आहे. ती चित्रपटासाठी तिथे गेली नसून मुलीच्या वाढदिवसासाठी गेली असल्याचा खुलासा तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोंमुळे झाला आहे. निशाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनी आणि तिचा नवरा वेबर यांची ठरवलं होतं, त्यानुसार ते अमेरिकेत गेले आहेत. सनी आणि वेबरनी निशाचा वाढदिवस अमेरिकेतील अॅरिझोना बेटावर साजरा केला .

सनीला आवडते १.१२ कोटींची ‘ही’ कार

सनीने निशाच्या वाढदिवसासाठी हॅलो किटीची थीम ठेवली होती,त्यानुसारच निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाला छोट्या निशाला सनीने राजकुमारी बनवलं होतं, तिला राजकुमारीसारखा छोटा मुकुटही घातला होता. निशाला सनी आणि तिचा नवरा वेबर यांनी काही महिन्यांपुर्वी लातूर जिल्ह्यातल्या एका आश्रमातून निशाला दत्तक घेतले आहे.

पाहा सनीचे दिलखेचक फोटोशूट

आपली प्रतिक्रिया द्या