सनी देओल हा फिल्मी फौजी, मी खरा फौजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका

सामना ऑनलाईन । अमृतसर

अभिनेता सनी देओलने नुकतंच भाजपमध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर पक्षाने सनीला तिकीटही दिली. सनी हा फिल्मी फौजी आहे, तर मी खरा फौजी आहे अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंह यांनी केली आहे. तसेच गुरुदासपुरमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सिंह म्हणाले की, “सनी देओल हा फिल्मी फ़ौजी आहे. तर मी खरा फौजी आहे. आम्ही गुरुदासपूरमधून निवडणूक जिंकू.” आमचे गुरुदासपूरचे उमेदवर सुनिल जखार यांना काहीच धोका नसल्याचेही सिंह यांनी म्हटले.