सनी देओल भाजपच्या वाटेवर, अमित शहांची घेतली भेट

28

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

बॉलीवूड अभिनेता सनी देओल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि सनी देओल यांचा एकत्र फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे सनी भाजपमध्ये प्रवेश करणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सनीने पंजाबमधून निवडणूक लढवावी अशी अमित शहा यांची इच्छा आहे. यासाठी त्यांची सनीबरोबर चर्चा सुरू आहे. दरम्यान,सनीचे राजकारणात येणे धर्मेंद्र यांना पसंत नसल्याचे कळते. मात्र सनी आणि अमित शहा यांच्यात नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अजून काही समोर आले नाही. तर पंजाबमधील गुरदासपूर आणि अमृतसर यासारख्या प्रतिष्ठेच्या जागेवर सनीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या