सनीने याबाबत प्रियंका चोप्रा, दीपिकालाही टाकलं मागे!

72

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच सनीचा ‘तेरा इंतजार’ ही चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी सनीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. या वर्षात म्हणजेच २०१७ मध्ये सनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त सर्च केली जाणारी अभिनेत्री ठरली आहे.

या रॅंकिंगमध्ये सनीने प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, करिना कपूर खान, या अभिनेत्रींना देखील मागे सारले आहे. २०१७ या वर्षातली याहूवर सर्वांत जास्त सर्च केली जाणारी महिला अभिनेत्री म्हणून सनी टॉपवर आहे. या लिस्टमध्ये सनी पाठोपाठ कतरिना कैफ, ईशा गुप्ता, दिशा पटानी आणि ममता कुलकर्णी यांच्या नावांचा देखील समावेश आहे. तसेच, विनोद खन्ना यांचे नाव अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये सर्वात वर आहे. तर, कपिल शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या