चेन्नईची आयपीएल फायनलमध्ये धडक

33

सामना ऑनलाईन । मुंबई 

मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यात हैदराबादचा २ विकेट्सने पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०१८ च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईच्या विजयाचा नायक ठरला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीवीर डू प्लेसिस. डू प्लेसिसने अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद ६७ धावा ठोकल्या.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्या क्वालिफार लढतील चेन्नई सुपर किंग्जच्या भेदक माऱ्यापुढे सनरायझर्स हैदराबादने १३९ धावांची मजल मारली. या सामन्यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये दाखल होणार आहे. तर पराभूत संघाला शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध फायनलमध्ये जाण्यासाठी लढावे लागेल.

चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्रररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर अनुभवी शिखर धवनला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या केन विल्यमसनने नेहमीच्या थाटात सुरुवात केली. मात्र तो यंदा फार मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. विल्यमसनला २४ धावांवर शार्दूल ठाकूरने बाद केले.

‘हे’ तीन दिग्गज खेळाडू आयपीएलनंतर करु शकतात क्रिकेटला अलविदा

विल्यमसन बाद झाल्यानंतर हैदराबादच्या मधल्या फळीवर मोठी जबाबदारी होती. मात्र ड्वेन ब्राव्होने अचूक गोलंदाजी करत मधल्या फळीला जखडून ठेवले. ब्राव्होने शाकीब अल हसन आणि युसूफ पठाणला बाद केले. तर रवींद्र जाडेजाने मनिष पांडेला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला.

आयपीएलमधील नाचक्की : गौतमचा ‘गंभीर’ खुलासा!

कार्लोस ब्राथवेटने अखेरच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादने चेन्नईसमोर १४० धावांचे आव्हान ठेवले. ब्राथवेटने सर्वाधिक ४३ धावा केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या