सुपर-30 चित्रपटाच्या ट्रेलरवर आनंद कुमार काय म्हणाले, वाचा सविस्तर

anand kumar hrithik roshan

सामना ऑनलाईन । पाटणा

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन नव्या भूमिकेतून तब्बल दीड वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सुपर-30 हा त्याचा चित्रपट आनंद कुमार या शिक्षकाच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रसारित झाला आणि त्यानंतर विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. खुद्द आनंद कुमार यांनी देखील बीबीसीला आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरनंतर हृतिकचे कौतुक होत आहे. मात्र अनेकांनी हृतिक ऐवजी मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी या अभिनेत्यांचा विचार करायला हवा होता असे म्हटले आहे. तसेच हृतिकला बिहारी बोली फारशी जमलेली नाही, अशी देखील टीका होत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना खुद्द आनंद कुमार म्हणाले की, ‘चित्रपटाचा ट्रेलर खूप चांगला आहे. चित्रपट देखील नक्कीच चांगला असेल. जेव्हा हृतिकला मी या रुपात पाहिलं तेव्हा मी स्वत:ला त्याच्यात पाहात होतो. माझे कष्ट, आधीचे दिवस आणि आठवणींना उजाळा मिळाला’, असे आनंद कुमार यांनी सांगितले.