जूनपासून ‘तेजस एक्प्रेस’ कोकणात धावणार

32

सामना ऑनलाईन,मुंबई

येत्या जूनपासून कोकण मार्गावर मुंबई आणि गोवा अशी ‘तेजस’एक्प्रेस धावणार आहे. या ट्रेनचे सर्व कोच मेट्रोप्रमाणे स्वयंचलित बंद होणारे दरवाजे आणि शेवटच्या डब्यापर्यंत प्रवाशांना जाता यावे यासाठी आत गँगवे असलेले असतील. या ट्रेनमधील प्रवाशांना सेलिब्रिटी शेफद्वारा खास तयार करण्यात आलेली पक्वान्ने सादर केली जाणार आहे. तसेच या ट्रेनमध्येच चहा आणि कॉफीची व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार असून प्रत्येक सीटवर प्रवाशांसाठी एलसीडी स्क्रीन आणि वाय-फाय सुविधा असणार आहेत. ट्रेनच्या बायो व्हॅक्युम टॉयलेटस्मध्ये वॉटर लेव्हल इंडिकेटर्स, टॉयलेट एंगेजमेंट बोर्ड असणार आहेत.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या