मावळंगेतील ग्रामस्थ भाजपला कंटाळले, शिवसेनेला मोठा पाठिंबा – विभागप्रमुख किरण तोडणकर

रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे नातुंडे ग्रामपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. 2017 पासूनच्या मावळंगे ग्रामपंचायतीतील भाजपच्या कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आता शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. शिवसेनेच्या सरपंचपदासाठी नम्रता बिर्जे यांना पाठिंबा मिळत असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी सांगितले.

किरण तोडणकर म्हणाले की, 2012 मध्ये मावळंगे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. त्यामध्ये अडीच अडीच वर्षे सरपंचपदाचे वाटप करण्यात आले होते. पहिली अडीच वर्षे सरपंच पद भाजपने उपभोगल्यानंतर शिवसेनेला सरपंच पद देण्यासाठी चालढकल करण्यात आली. त्यामुळे 2017 ची निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली. या निवडणुकीत शिवसेनेचे 5 सदस्य निवडून आले. सरपंचपदाचा उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाला. मात्र 5 वर्षांतील भाजपच्या कारभाराला मावळंगेवासीय वैतागले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार नम्रता बिर्जे याना ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे. नुकतीच शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांशी चर्चा करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख किरण तोडणकर, सुभाष पावसकर, अमृत पोकडे, गुरव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.