फाशी ही क्रूर शिक्षा! देहान्ताची पर्यायी शिक्षा सुचवा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

हे पाच न्यायमूर्ती सध्या काय करतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. या पाचपैकी 4 न्यायमूर्ती हे आता निवृत्त झाले असून यातले एक न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत.

फाशीची शिक्षा ही क्रूर असून देहान्ताची पर्यायी शिक्षा सुचवण्यासाठी समिती गठित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. ही समिती फाशीच्या शिक्षेला कमी वेदनादायक असा पर्याय सुचवण्यासाठी चर्चा व्हावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. देहान्तांसाठी फाशी ही अतिशय क्रूर शिक्षा असल्याचं म्हणत त्याला पर्यायी शिक्षा देण्यात याव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी अनेक पर्यायी शिक्षांचा उहापोह करण्यात आला. देहान्ताच्या पर्यायी शिक्षांमध्ये गोळी झाडणे, विषारी इंजेक्शन किंवा विजेची खुर्ची या तीन पर्यायांचा वापर होऊ शकतो का, अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे.

लॉ कमिशन अहवालाचा दाखला देऊन अॅड. ऋषी मल्होत्रा यांनी फाशी ही शिक्षा क्रूर असल्याचं म्हटलं आहे. त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी वेदना ही व्यक्तिसापेक्ष वेगळी असते. त्यामुळे आपल्याला पर्यायांचा अवलंब करण्यापूर्वी वैज्ञानिक अहवालांचा पडताळा घ्यावा लागेल, असं स्पष्ट केलं.

आजही मृत्यू पावणाऱ्या दोषीचा वैयक्तिक सन्मान आणि कमीत कमी वेदनादायक मृत्यू या दोन्ही निकषांवर फाशी हा योग्य पर्याय वाटतो. या निकषांवर इंजेक्शन योग्य ठरू शकेल का? अमेरिकेने इंजेक्शन हा पर्याय योग्य मानला आहे, असं न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांनी यावेळी म्हटलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 2 मे रोजी ठेवण्यात आली आहे.