बाबरी पतन प्रकरणी भाजप नेत्यांवर खटला चालवण्याचा निर्णय राखून ठेवला

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बाबरी पतन प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालवावा अशी मागणी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. आता सर्वोच्च न्यायालय ज्यावेळी आपला निर्णय जाहीर करेल त्यावेळी बाबरी पतन प्रकरणी भाजप नेत्यांवर खटला चालवणार जाणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

भाजपच्या नेत्यांसह १४ जणांविरोधात बाबरी पतन प्रकरणी गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालवण्याची मागणी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सध्या रायबरेली आणि लखनऊ येथे बाबरी पतन प्रकरणाचे दोन स्वतंत्र खटले सुरू आहेत. लखनऊच्या न्यायालयात १९५ साक्षीदारांची साक्ष झाली आहे आणि अद्याप ५०० जणांची साक्ष व्हायची आहे तर रायबरेलीच्या न्यायालयात ५७ जणांची साक्ष झाली आहे आणि १०० जणांची साक्ष व्हायची आहे. त्यामुळे एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आजच्या सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. याआधी ६ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी फक्त तांत्रिक कारणामुळे कोणालाही आरोपमुक्त करणे स्वीकारणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या