सर्वोच्च न्यायालय आमचेच, भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘राम मंदिराचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे आमचेच आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य वर्मा यांनी केले आहे. वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं असून त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राम मंदिर होऊ नये म्हणून दाऊद सक्रीय, रचला खतरनाक कट!

‘भाजप विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत आली आहे. राम मंदीर हे बांधले जाणारच कारण आमच्या पक्षाने तसा संकल्प केला आहे. राम मंदिराचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचेच आहे. न्यायपालिका, देश तसेच राम मंदीर हे देखील आमचेच आहे’, असे मुकुट वर्मा यांनी पत्रकारांना सांगितले.

SUMMARY : Supreme Court is ours, SAYS BJP minister Mukut Bihari Verma