अर्थव्यवस्था ढासळत असताना आश्वासनांची खैरात चिंताजनक

निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांकडून लोकांना मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सुविधा ही एक गंभीर समस्या असल्याचे मत सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी व्यक्त केले आहे. तसेच यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचेदेखील ते म्हणाले. निवडणुकांच्या काळात अशा प्रकारे राजकीय पक्षांकडून मतदारांना भुलवणाऱ्या घोषणा केल्या जाण्यावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश रमण्णा यांनी ही टिपण्णी केली.