नव्याने निवडणूक घ्या! सर्वोच्च न्यायालयाचे तिरंदाजी संघटनेला आदेश

15
supreme-court

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडियाचा (एएआय) पाय खोलात गेला आहे. बीव्हीपी राव यांनी एएआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवडय़ांच्या आत नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एस. वाय. कुरेशी यांची एएआयवर प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यांनी तयार केलेल्या नव्या घटनेच्या आधारे निवडणूकही पार पडली, पण या निवडणुकीला महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनकडून आव्हान देण्यात आले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आपला निर्णय देताना नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

क्रीडा सिस्टमला सक्षम नेतृत्व नकोय – राव

हिंदुस्थानातील क्रीडा सिस्टमला सक्षम व वचनबद्ध नेतृत्व नकोय. त्यामुळेच एएआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. प्रशासकाकडून करण्यात आलेले बदल स्वीकारले जात नाहीत, अशी खंत पुढे त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या