राहुल गांधींना दिलासा, न्यायालयाकडून माफी मंजूर

1108

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीप्रकरणी दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी मागितलेली माफी मजूर केली आहे. यासह न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, राहुल यांच्या विरूद्ध आता कोणतंही अवमान प्रकरण चालवले जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, घटनात्मक पदावर बसलेल्या लोकांनी काळजीपूर्वक वक्तव्य केले पाहिजे. राजकारणीच्या वादात कोर्टाला खेचणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी याबाबत माफी मागितली होती. आम्ही ती मजूर करत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

‘चौकीदार चोर हैं’ हे न्यायालयाला मान्य असल्याचे वक्तव्य राहुल यांनी केले होते. भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी यास आक्षेप घेत राहुल यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात राहुल गांधी यांना नोटीस बजावत संदर्भासह स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. प्रतिज्ञापत्राद्वारे या नोटिसीला दिलेल्या उत्तरात राजकीय प्रचाराच्या ओघात चुकीचे वक्तव्य आपल्याकडून झाले. न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा माफीनामा न्यायालयात सादर करत राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त होती. दरम्यान, गुरुवारी या प्रकरणी सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या