NPR च्या प्रक्रियेस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्राला नोटीस जारी

484
supreme-court-of-india

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या प्रक्रियेला (एनपीआर) स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच न्यायालयाने केंद्राला याबाबत नोटीस पाठवली आहे. एनपीआरच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ‘आधार’मध्ये दिलेल्या माहितीच्या (डेटा) सुरक्षेची हमी आहे. मात्र एनपीआरमध्ये नागरिकांची नोंदणी आणि ओळखपत्र देण्याच्या कामात जमवण्यात येणाऱ्या माहितीच्या सुरक्षेची कोणतीही हमी नाही. त्यामुळे या माहितीची दुरुपयोग होऊ शकतो, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकवेर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एनपीआरच्या प्रक्रियेला स्थिगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच याबाबत केंद्राला नोटीस जारी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या