पाच विद्यार्थ्यांसाठी दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने उद्या, रविवार 11 ऑगस्ट रोजी होणारी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यास आज नकार दिला. ऐनवेळी अशी परीक्षा पुढे ढकलता येणार नाही. आम्ही वेळापत्रक बदलणार नाही, असे सरन्यायाधीश म्ंहणाले.