सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करण्याची गरज नाही- सर्वोच्च न्यायालय

supreme-court

बँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपर्यंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावं या मागणीसाठी दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

भाजप नेत्या अॅडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. सोशल मीडियावरील फेक अकाउंट्स, होणारं अमर्याद ट्रोलिंग, पेड न्यूज यांना आळा बसावा म्हणून आधार कार्ड सोशल मीडिया अकाउंट्सना लिंक करण्याबाबतची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

सर्व जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणण्याची गरज नाही. उच्च न्यायालयेही याबाबत सुनावणी घेऊ शकतात. सोशल मीडियासंबंधीची प्रकरणं मद्रास उच्च न्यायालयात दाखल आहेत, त्यामुळे याचिकाकर्त्याची इच्छा असेल तर ही याचिका देखील तिथेच दाखल करण्यात यावी असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

आपली प्रतिक्रिया द्या