नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य असलेल्या ’झुंड’ या चित्रपटापुढील अडचणी काही थांबताना दिसत नाहीत. कॉपीराईटच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. आता सर्वेच्च न्यायालयाने देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील प्रतिबंध हटवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

झुंड या चित्रपटाची कथा आपल्या कथेची नक्कल असल्याचे म्हणत नंदी चिन्नी पुमार यांनी या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकला होता. झुंडच्या निर्मात्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने मात्र बिग बींच्या या चित्रपटावर बंदी घातली. पुढे या बंदी विरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जस्टिस बोबडे, केएस बोपन्ना आणि वी रामा सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने देखील ‘झुंड’ चित्रपटाला दिलासा दिला नाही. परिणामी या चित्रपटाचे प्रदर्शन आता आणखी रखडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या