अर्जुन खोतकर यांना दिलासा

सामना ऑनलाईन । मुंबई

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे अर्जुन खोतकर यांना दिलासा मिळाला आहे.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीवेळी आमदारकी रद्द झाल्यामुळे खोतकर यांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. मात्र स्थगिती मिळाल्यामुळे खोतकर यांची आमदारकी आणि मंत्रिमंडळातील स्थान दोन्हीला धक्का लागलेला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे यांनी नोव्हेंबर महिन्यात खोतकर यांची आमदारकी रद्द केली होती. खोतकर यांच्या निवडीस काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल आणि मतदार विजय चौधरी यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या