तोंडी तलाकविरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

414

तोंडी घटस्फोटांपासून मुस्लीम महिलांचे संरक्षण व्हावे, यासाठी केंद्राने तयार केलेल्या ट्रिपल तलाक कायद्याला आव्हान देणाऱया चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून लवकरच त्यांच्यावर सुनावणी करण्यात येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आज नोटीस बजावली आहे.

तोंडी तलाकला देशभरातील मुस्लीम संघटनांनी विरोध केला आहे. त्या विरोधात ‘जमीयत-उलमा-ए-हिंद’ तसेच केरळच्या ‘जमीयूल उलेम’ या संघटनने याचिका दाखल केली आहे. मुस्लीम धर्मात पतीने पत्नीला तोंडी तलाक देण्याला मान्यता नाही तसेच बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या नव्या कायद्याची गरज नाही. हा कायदा रद्द करावा, असे काही संघटनांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या